स्केच काढायला मॉडेल शोधायचं झालं की घुमुन फिरुन शेवटी माझी गाडी नेहेमी हिच्यावरच येते.
मला आठवतंय मधुबालाचं सर्वात पहिलं स्केच मी शाळेत असताना काढलं होतं. साधारण आठवी-नववीत. तेव्हा बर्यापैकी जमलंही होतं ते त्यामुळे मी खूष होते. ते पाहून मैत्रिणीने विचारलं 'घरी दाखवायला नेऊ का.' म्हटलं ने. दुसर्या दिवशी परत आलं ते फाटूनच. अक्षरश: दोन भाग झाले होते. ते सेलोटेपने कसेतरी जोडलेले. सगळा मूडच गेला. खूप वाईट वाटलं. त्यानंतर बरीच वर्ष मधुबालाच्या वाटेला गेलेच नाही.
आता रंगीत मुगल-ए-आजम ने परत तो उत्साह आणला. तिचा सर्वात सुंदर क्लोज-अप मिळवण्यासाठी प्रत्येक शॉटला पॉज घेत घेत सिनेमा अथ पासून इतिपर्यंत मनसोक्त चाळला. सर्वात सुंदर माझ्या मते ती 'मोहे पनघट पे' च्या 'नैनोंसे जादू किया' च्या या दृष्यात दिसल्ये. :)
Tools used: Derwent Charcol Medium & Dark, RAFFINE 2B Graphite pencil
(Enlarge करण्यासाठी चित्रावर टिचकी मारा.)


2 Comments:
अप्रतीम...
great art work!!!!!!!!!
-Leena Devasthali
Post a Comment
<< Home